Wednesday, August 24, 2011

नैवैद्य !

लहान असताना (किती छान वाटतात हे शब्द , "लहान असताना! ") एक गोष्ट सांगायची.

नामदेवाची. नामदेव लहान असताना, त्यांची आई त्यांना एका वाटी नैवैद्य देते. म्हणते, 'जा नाम्या, विठ्ठला ला नैवैद्य दाखवून ये '. नाम्या जातो देवळात ! विठ्ठलाच्या त्या सुंदर काळ्या मूर्तीसमोर वाटी ठेवतो. म्हणतो देवाला, 'देवा, नैवैद्य स्वीकार करा '. वाट बघतो...पण छे...देव काही खायला येत नाही! आता काय करायचा? देव का खात नाही? 'देवा, रोज आई नैवैद्य दाखवते, तो तर तुम्हाला चालतो, आज मी आणलाय म्हणून रागावलात का '. नाम रडायला लागतो. देवाला सांगतो, 'जर तुम्ही नाही खाल्ला, तर मी इथून जाणार नाही ' . तिथेच विठल्लाचा नाव घेत बसतो.
देव त्या भोळ्या भक्तीला प्रसन्ना होतो, आणि खरच प्रकट होतो !!! नाम्या ला खूप खूप आनंद होतो. तो देवाला नैवैद्य भरवतो, आणि घरी परत जातो.
आई विचारते, 'नाम्या, एवढा वेळ का रे लागला तुला? आणि, नैवैद्य कुठे आहे? खावून टाकलास कि काय?' नाम्या म्हणतो, 'नाही ग आई, देव न आज नैवैद्य खातच न्हवता. त्याची खूप खूप प्रार्थना केली, तेंवा कुठे तो आला !' . आई ला काही कळेना. 'अरे देव कुठे खरच खात असतो का? खोटं नको बोलूस. तूच नैवैद्य खाऊन टाकलास न.' नाम्याला कळेना, आई असा का म्हणते. 'नाही ग आई. खरच. खरच माझ्या विठ्ठलाने माझ्या हातून नैवैद्य खाल्ला!'
दुसरया दिवशी परत आई त्याला नैवद्य देते. नाम्या जातो. आई त्याच्या मागे जाते...आणि...आणि काय आश्चर्य...स्वतःच्या डोळ्याने विठ्ठलाला नाम्याच्या हातून नैवैद्य खाताना बघते, आणि तिचे पण डोळे भरून येतात...


मागच्या रविवारी शिरा बनवला. (पहिल्यांदा स्वतः काही बनवलं! ) पण...कोणीच खायला नाही. (माझ्याशिवाय!) म्हणून हि गोष्ट आठवली. देवाला नैवैद्य दाखवण्यामागाच्या भावना कळल्या. केवळ आई म्हणते, म्हणून देवासमोर वाटी ठेवली, असा नाही झालं.

तेंवा असा वाटलं, खरच यावं देवाने...खरच यावं...कोणत्याही रूपात....आणि, आणि मी बनवलेला शिरा खावा. :)

शेवटी, २ घास खाऊन, fridge मध्ये ठेऊन दिला. .... देव आलाच नाही खायला ;)
कोणीच आला नाही....

Wednesday, June 30, 2010

Status Report!


mailbox मध्ये रोज server status report येतो. memory utilization, CPU utilization, DB spikes असा काय काय असता त्यात.

कोणी असा आपला status असा automatically measure केला तर? काय येईल त्यात? Parameters थोडी फार अशी असतील: Physical status, Mental status, Emotional status, Brain status... :)
दिवसाच्या वेळेनुसार काही फरक पडेल? म्हणजे सकाळी आपण म्हणे फार उत्साहात असुयात, आणि दिवस संपता संपता energy संपून गेली असेल. ... तसा काही नसता हो. मला तर सकाळपासूनच कंटाळा येतो.

विचार थांबत नाहीत न...थोडासा मोकळा वेळ मिळाला नाही...कि डोक्यातली ती background process एकदम active होते. आणि तोच तो program run करते. थांबवायचा तरी कसा हो? Auto running process आहे ही.

आणि दिवसाच्या शेवटला, कामाचा tension, उद्याचा काम, कोणाला काय काय mails send करायच्यात, etc etc विचार करत आपण hibernate mode मध्ये निघून जातो! उद्यापासून एखाद्या machine प्रमाणे तेच काम, तेच विचार, तीच lifestyle, तेच depression , तीच shopping , तेच बोलणं, तेच हसणं, No Spikes!
status report रोज same असेल.
Stable Environment. Great!

Sunday, April 25, 2010

एकाकी...

माहित नाही ग मला! कोणी वाचणार तरी आहे का नाही...पण, लिहायला काय जातंय! तसाही दिवसभर laptop वर गाणी ऐकून, movies बघून कंटाळलेय!
इतर लोकांचे तर blogs मी खुउप वाचते! अगदी सगळा मराठी ब्लॉग परिवार ओळखीचा झालाय माझ्या!
पण वाटला नाही कधी..कि मी पण blog लिहावा.

तशी मी खूप introvert ...माझ्या feelings एकदम जवळच्या व्यक्तीशी तेवढी share करणारी...पण...ब्लॉग च्या नावावरून कळला असेल....की आत्ता मी खरच एकटी आहे...
म्हणून ह्या ब्लोग ला मी माझा मित्र बनवणार आहे....बघू....कितपत जमतंय...