Wednesday, August 24, 2011

नैवैद्य !

लहान असताना (किती छान वाटतात हे शब्द , "लहान असताना! ") एक गोष्ट सांगायची.

नामदेवाची. नामदेव लहान असताना, त्यांची आई त्यांना एका वाटी नैवैद्य देते. म्हणते, 'जा नाम्या, विठ्ठला ला नैवैद्य दाखवून ये '. नाम्या जातो देवळात ! विठ्ठलाच्या त्या सुंदर काळ्या मूर्तीसमोर वाटी ठेवतो. म्हणतो देवाला, 'देवा, नैवैद्य स्वीकार करा '. वाट बघतो...पण छे...देव काही खायला येत नाही! आता काय करायचा? देव का खात नाही? 'देवा, रोज आई नैवैद्य दाखवते, तो तर तुम्हाला चालतो, आज मी आणलाय म्हणून रागावलात का '. नाम रडायला लागतो. देवाला सांगतो, 'जर तुम्ही नाही खाल्ला, तर मी इथून जाणार नाही ' . तिथेच विठल्लाचा नाव घेत बसतो.
देव त्या भोळ्या भक्तीला प्रसन्ना होतो, आणि खरच प्रकट होतो !!! नाम्या ला खूप खूप आनंद होतो. तो देवाला नैवैद्य भरवतो, आणि घरी परत जातो.
आई विचारते, 'नाम्या, एवढा वेळ का रे लागला तुला? आणि, नैवैद्य कुठे आहे? खावून टाकलास कि काय?' नाम्या म्हणतो, 'नाही ग आई, देव न आज नैवैद्य खातच न्हवता. त्याची खूप खूप प्रार्थना केली, तेंवा कुठे तो आला !' . आई ला काही कळेना. 'अरे देव कुठे खरच खात असतो का? खोटं नको बोलूस. तूच नैवैद्य खाऊन टाकलास न.' नाम्याला कळेना, आई असा का म्हणते. 'नाही ग आई. खरच. खरच माझ्या विठ्ठलाने माझ्या हातून नैवैद्य खाल्ला!'
दुसरया दिवशी परत आई त्याला नैवद्य देते. नाम्या जातो. आई त्याच्या मागे जाते...आणि...आणि काय आश्चर्य...स्वतःच्या डोळ्याने विठ्ठलाला नाम्याच्या हातून नैवैद्य खाताना बघते, आणि तिचे पण डोळे भरून येतात...


मागच्या रविवारी शिरा बनवला. (पहिल्यांदा स्वतः काही बनवलं! ) पण...कोणीच खायला नाही. (माझ्याशिवाय!) म्हणून हि गोष्ट आठवली. देवाला नैवैद्य दाखवण्यामागाच्या भावना कळल्या. केवळ आई म्हणते, म्हणून देवासमोर वाटी ठेवली, असा नाही झालं.

तेंवा असा वाटलं, खरच यावं देवाने...खरच यावं...कोणत्याही रूपात....आणि, आणि मी बनवलेला शिरा खावा. :)

शेवटी, २ घास खाऊन, fridge मध्ये ठेऊन दिला. .... देव आलाच नाही खायला ;)
कोणीच आला नाही....